Skip to main content

Command Palette

Search for a command to run...

Swapnil Tamhane... मित्रा... तू अजूनही सोबत आहेस

Updated
•2 min read•View as Markdown
Swapnil Tamhane...

मित्रा... तू अजूनही सोबत आहेस
S
Satish Waghole Expert Developer | Automotive Software Architect | Tech Enthusiast

माझ्या प्रिय बालमित्रासाठी ही केवळ कविता नाही, तर बालपणापासून तारुण्यापर्यंत सोबत चाललेल्या मैत्रीची आठवण आहे. अशा वेळी शब्द अपुरे पडतात, पण मनातल्या भावना व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

स्वप्निल,

बालवाडीच्या त्या छोट्याशा वर्गातून
आपल्या मैत्रीचा प्रवास सुरू झाला होता,
ना कोणते वचन, ना कोणता करार,
फक्त दोन निरागस मनांचा आधार होता.

चौथीपर्यंतचे ते दिवस,
शेजारी बसून गप्पा, खेळ, भांडणं,
आणि मग काळाने थोडं दूर नेलं,
पण मैत्रीचे धागे कधी तुटलेच नाहीत.

आठवीत पुन्हा भेटलो आपण,
जणू वेळही हसून म्हणाली,
"ही जोडी पुन्हा एकत्र यायलाच हवी होती..."

शाळेच्या त्या वाटेवर रोज,
सोबतच चालायचो आपण,
कधी हसत, कधी धावत,
तर कधी स्वप्नांच्या गप्पांत हरवून जायचो आपण.

गोट्या, विटी-दांडू, सूरपारंब्या, पकडा-पकडी,
बालपणाचे ते खेळ अजूनही मनात जिवंत आहेत,
जणू प्रत्येक मैदानाचा कोपरा
आजही आपल्या मैत्रीची साक्ष देत आहे.

आठवीत मी वर्गात उशिरा आलो,
पण तू माझ्यासाठी जागा राखून ठेवली होतीस,
कुणालाही तिथे बसू दिलं नाहीस,
हेच तर तुझं न बोलता जपलेलं प्रेम होतं.

आणि बारावीतही तेच चित्र होतं,
कॉलेजमध्ये माझी जागा तुझ्याशेजारीच असायची,
मैत्रीचं ते नातं इतकं घट्ट होतं की,
अंतर कधीच आपल्या मध्ये आलंच नाही.

सारख्याच बॅगा, सारख्याच वॉटरबॉटल्स,
आणि खोड्यांतली आपली अटळ भागीदारी,
"Partner in Crime" म्हणायचो आपण स्वतःला,
कारण प्रत्येक मस्तीमध्ये साथ असायची तुझी.

सुट्टीचे दिवसही वेगळे नव्हते,
पुन्हा खेळ, पुन्हा गप्पा, पुन्हा धमाल,
आयुष्य किती साधं आणि सुंदर होतं,
जेव्हा "आपण" हा शब्दच पुरेसा होता.

बारावीपर्यंतचा तो प्रवास,
परीक्षा, अभ्यास, स्वप्नं आणि धडपड,
एकमेकांच्या यशात आनंद मानणं,
आणि अपयशात खांदा देऊन उभं राहणं.

पुण्याला इंजिनीरिंग च्या क्लासमध्येही
आपण सोबतच होतो,
मोठी स्वप्नं डोळ्यांत घेऊन
उद्याच्या दिशेने धावत होतो.

कधी कॅन्टीनमधल्या गप्पा,
कधी रस्त्यांवरची भटकंती,
कधी भविष्याची रंगवलेली चित्रं,
सगळंच आज पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहतं.

पण मित्रा,
हे कधीच वाटलं नव्हतं की
एवढ्या लवकर तू निरोप घेशील...

आज तुझा नंबर फोनमध्ये आहे,
पण कॉल करण्याचं धाडस होत नाही.
आठवणी मात्र रोज फोन करतात,
आणि मन पुन्हा त्या दिवसांत हरवतं.

तू गेलास म्हणणं सोपं आहे,
पण खरं सांगायचं तर
तू कुठेच गेलेला नाहीस.

प्रत्येक जुन्या फोटोमध्ये,
प्रत्येक आठवणीत,
प्रत्येक हसण्यात आणि प्रत्येक अश्रूत
तू अजूनही तसाच जिवंत आहेस.

देवाने तुला आमच्यामधून घेतलं असेल,
पण आपल्या मैत्रीच्या कथा
कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

आज फक्त एवढंच सांगावंसं वाटतं...

धन्यवाद मित्रा,
माझ्या आयुष्यातील इतकी सुंदर वर्षं सोबत चालल्याबद्दल.

पुन्हा कधीतरी,
कुठल्यातरी वेगळ्या वाटेवर,
भेटशीलच तू...

तोपर्यंत,

तुझा मित्र,
सतिश.
❤️

"माणसं जातात, पण त्यांच्या आठवणी आयुष्यभर आपल्या हृदयात घर करून राहतात." 🌹

Stories From The Journey

Part 1 of 1

Personal stories, memories, significant events, and defining moments.

More from this blog

2. Artful living

अयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या पाठ फिरू दे

Sep 30, 20261 min read
2. Artful living

Artful living

हे भलते अवघड असते! – संदीप खरे गाडी सुटलि, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओलेगाडी सुटलि, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झालेगाडी सुटलि, हाता मधुनि हात कापरा तरी सुटेनाअंतरातली ओली माया तुटुदे म्हणतले तरी

Sep 30, 20262 min read
Artful living

Code, Cars & Curiosity

6 posts

Exploring technology, life, and everything in between. From software architecture, embedded systems, and AI to health, mindfulness, travel, psychology, poetry, and personal reflections. A place for curious minds who believe learning never stops.