# 2. Artful living

## अयुष्यावर बोलू काही

`जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !`  
`चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !`

  
`उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू`

`भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही`

`तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या`

`पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही`

`हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे`

`नकोनकोसे हळवे कातर बोलू काही`

`उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन`

`परवा आहे उद्याच नंतर बोलू काही`

`शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी`

`वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही`
